मराठा आरक्षणाबाबत विविध मागण्या पूर्ण न झाल्यास २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. २९) केली आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी गोदाकाठच्या १२३ गावातील हजारो मराठा बांधव उपस्थित होते.


जरांगे म्हणाले, ”सरकारने सगेसोयरे अंमलबजावणी करावी. २००४ च्या जीआरची दुरूस्ती करावी. त्यात शिथिलता आणावी. २९ सप्टेंबरच्या आत हैदराबाद, सातारा, बॉंबे गॅझेट लागू करावी, आदी मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. मराठ्यांच्या विरोधात बोलणारे भाजपचे सगळे आमदार पाडा, असे आवाहन ही जरांगे यांनी यावेळी केले. आता आरपारची लढाई होणार आहे. मराठ्यांनी अशीच एकजूट ठेवा, ” असे आवाहन त्यांनी केले.