अहमदनगर — गेली नऊ वर्षांपासून एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भोसे येथील पत्रकार भिवसेन टेमकर यांना एन टीव्ही न्यूज मराठी या वृत्तवाहिनीने गेल्या पाच वर्षांत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात समता बंधूता आणि सामाजिक एकता जोपासण्यासाठी तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रामाणिकपणे भूमिका बजावली.त्यानिमित्ताने अहमदनगर येथील हॉटेल व्ही स्टार येथे मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी एन टिव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार पत्रकार भिवसेन टेमकर यांना डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी
नगरसेवका शितलताई जगताप,डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे सचिव महेश कुगावकर,अहमदनगर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातपुते,प्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते संजय कळमकर,ॲड.सुभाष काकडे,एन टीव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक इकबाल शेख,जेष्ठ पत्रकार किशोर मरकड,पत्रकार सुभाष चिंधे यांच्यासह महाराष्ट्रातील एन टिव्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा,तालुका प्रतिनिधी व इतर प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच पत्रकार भिवसेन टेमकर यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार निलेश लंके,आमदार प्राजक्त तनपुरे,आमदार मोनिकाताई राजळे,माजी खासदार डाॅ.सुजय विखे पाटील,अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले,माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर,करंजी प्रेस क्लबचे तुळशीदास मुखेकर,विलास मुखेकर,अशोक मोरे यांच्यासह सर्व पक्षाचे कार्यकर्ते,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी पत्रकार भिवसेन टेमकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
