ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन निषेध मोर्चा काढत घेतली शोकसभा

पाथर्डी — अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगाव येथील मच्छिंद्र ससाणे यांच्या वस्तीवर गुरुवारी रात्री चोरट्यांनी टाकलेल्या दरोड्यामध्ये ससाणे यांचा मृत्यू झाला.त्यानंतर तिसगाव मधून मोठा संताप व्यक्त करण्यात आला सर्व ग्रामस्थांनी रविवारी तिसगाव बंदची हाक देत निषेध मोर्चा काढून आयोजित केलेल्या शोकसभेमध्ये पोलीस प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढत आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन करू असा सामुहिक इशारा दिला.यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की तिसगावमध्ये घडलेल्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा एलसीबीकडे देण्यात यावा.त्याचबरोबर दोन दिवसात या घटनेचा तपास लागला नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षकांना तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन जाब विचारला जाईल.त्याचबरोबर तिसगाव येथे नवीन पोलीस स्टेशन करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असून त्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पोलीस स्टेशनचा देखील पाठपुरावा करणार असल्याचे कर्डिले म्हणाले.तिसगावमध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत असून तिसगावचे नागरिक भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहेत.पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आठ दिवसात दरोड्यातील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन तिसगावमध्ये करणार असल्याचा इशारा माजी सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी यावेळी दिला.यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे,सरपंच इलियास शेख,पुरुषोत्तम आठरे,कुशल भापसे,नितीन लोमटे,अरविंद सोनटक्के,रामदासी महाराज,रफिक शेख,बाबा पुढारी,नंदकुमार लोखंडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करतांना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली व अशा घटना यापुढे घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.रविवारी निघालेला मूक मोर्चा शनी मंदिरापासून वृद्धेश्वर चौक,मुख्य बाजारपेठ पुढे महादेव मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी शोकसभा घेण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने तिसगाव ग्रामस्थ उपस्थित होते.आरोपींना पकडण्यासाठी चार पथक रवाना करण्यात आली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करू असा विश्वास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी ग्रामस्थांना दिला.यावेळी चेअरमन भारत गारुडकर,अरुणदेवा पुंड,संजय लवांडे,पंकज मगर,अमोल भुजबळ,माधव लोखंडे,बिस्मिल्ला पठाण,ताहेर सय्यद,अंबादास शिंदे,मनोज ससाणे,गणेश गारदे,डॉ.काशिनाथ ससाणे,शंकरराव उंडाळे,संतोष छाजेड,सुनील शिंगवी,सदाशिव मैड,पापाभाई तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *