आधूनिक भारताच्या शिक्षणामध्ये गौरी ह्या कोण आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? आणि मानवी जीवनात त्यांचे योगदान काय आहे ? यांचा अभ्यास करीत बसण्यापेक्षा ज्या दोन मातांनी उभ्या जगाला खूप मोठा संदेश दिला आहे तो म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ यांनी या देशाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे दोन युगपुरुष दिले. ज्यांच्या माध्यमातून पुढे त्याने बहुजनांचे स्वराज्य उभे केले. इथल्या पीडित शोषितांना न्याय दिला आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशातील महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. कदाचित सावित्रीबाई फुले यांचा जन्मच झाला नसता तर या देशातील महिला गुलाम म्हणून जगल्या असत्या. केवळ चूल आणि मुलं या पलीकडे त्यांचा इतिहास गेला नसता. प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या मागील स्त्री म्हणजे माता रमाई आंबेडकर या होत्या..! तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई. अहिल्यादेवी होळकर यांच्याही फोटो प्रतिमेचे पूजन केले.
आरास म्हणून कृषी परंपरेतील साज ठेवले झाडे लावा पर्यावरण वाचवा. असे संदेश दिले आहेत..
यामुळे या दोन महिलांच्या चरित्राचा अभ्यास करून सातेफळ येथील परिवर्तनवादी दाम्पत्य अनिता अंबऋषी क्षिरसागर यांनी त्यांच्या घरी ह्या आधुनिक मातांचे पूजन करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या आधुनिक गौरीच्या समोर त्यांनी आरास म्हणून कृषी परंपरेतील साज ठेवले होते. तसेच समग्र भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले भारताचे संविधान, अब्दुल कलाम यांचे अग्निपंख, छत्रपती संभाजी महाराज यांचा ग्रंथ बुधभूषण, जगतगुरू तुकाराम महाराज यांची गाथा, संत नामदेवांची गाथा, भगतसिंग यांचे जीवन चरित्र या आणि अशा अनेक ग्रंथाची आरास त्यांनी लावली होती.नेहमीच विद्यार्थ्यांना दिशादर्शक शिक्षण देत असतात. यामध्ये त्यांचे दोन्ही सुनाचे सुनीता ऋषिकेश क्षिरसागर आणि विद्यारानी ऋषीराज क्षिरसागर यांचे पण खूप सहकार्य आहे .मॉसाहेब जिजाऊ आणि सावित्रीमाई च्या विचारांची जनजागृती देखील केली आहे. आणि त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव