section and everything up until
* * @package Newsup */?> विविध विकास कामांचे भूमिपूजन:शाखा स्थापन व पक्षप्रवेश, नवनियुक्त्या. | Ntv News Marathi

सचिन बिद्री:धाराशिव

मौजे.औराद ता.उमरगा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन दि.12 रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
गावामध्ये शिवसेना व युवासेना शाखा स्थापन करण्यात आल्या.माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून माजी सरपंच व युवकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये माजी सरपंच जितेंद्र सूर्यवंशी, यशवंत पवार, सूरज पाटील, राणेश घाटे यांचे नावं असून तर यामधील माजी सरपंच जितेंद्र सूर्यवंशी यांची शेतकरी सेना उपतालुकाप्रमुख, विनोद बाबुराव गायकवाड यांची पंचायत समिती गुंजोटी गणप्रमुख, युवासेना जि.प.गुंजोटी गणप्रमुख पदी प्रसाद गणपतराव गायकवाड, शाखाप्रमुख नागेश गायकवाड, उपशाखाप्रमुख परमेश्वर सोमवंशी, उपशाखाप्रमुख सुभाष दूधभाते, सोशल मीडिया प्रमुख सागर सूर्यवंशी, शाखा सचिव सुभाष गायकवाड, युवा सेना शाखाप्रमुख अनिल शिंदे, उपशाखाप्रमुख संभाजी सूर्यवंशी, उपशाखाप्रमुख राजेश घाटे, युवासेना सचिव सुरज पाटील, युवा सेना सहसचिव पवन कदम यांच्या नियुक्तया करण्यात आल्या.
यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पक्षप्रवेश केलेल्या व नवनियुक्त या सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करत येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल व शिवसेना पक्ष संघटना बळकट कराल असा विश्वास व्यक्त केला. तसेच ग्रामीण भागातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि गावोगावी सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. ही मतदारसंघात आपण केलेल्या विकासकामांची पावती असून शहरासह ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला जनतेचा मिळणारा पाठिंबाच आहे. तसेच शिवसेनेत आलेल्या प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळेल व विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्यांचाही मोलाचा सहभाग असेल असे मनोगत व्यक्त करत महायुती शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या जनहिताच्या योजनांचा प्रत्येकाला लाभ मिळवून द्यावा अशा सूचना यावेळी केल्या व त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.
कार्यक्रमास उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, सरपंच सुशील जाधव, उपसरपंच रमेश कारभारी, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख योगेश तपसाळे, युवासेना विधानसभा संघटक शरद पवार, युवासेना तालुकाप्रमुख विनोद कोराळे, विद्यार्थी सेनेचे संदीप चौगुले, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, शरद इंगळे, राजेंद्र माळी, प्रदीप शिवणेचारी, दत्ता डोंगरे, अनिल जगताप, तानाजी भिसे, युवराज गायकवाड, माधव पाटील, आदी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *