♦️गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस आले आहेत. नगर विभागाने ऑगस्ट महिन्यात नगर जिल्ह्यातील ११ आगारातून ३० लाख ९२ हजार रुपयांचा नफा कमवला आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली.


♦️राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत, या दोन योजना सुरू केल्या. ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची मान उंचावली आहे.