लातूर प्रतिनिधी

♦️ईद ए मीलादुन्न नबी निमित्त लातूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजातील नागरिक
मिरवणूकित सहभागी झाले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षीही लातूर शहरात ईद ए मीलादुन्नबी निमित्ताने शहरातील काझी मोहल्ला येथील सोफिया मस्जिद येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून ही मिरवणूक शाहू चौक मार्गे गोलाई येथून सुभाष चौक, दयाराम रोड मार्गे हजरत सुरत शाहवली दर्गा येथे संपन्न झाली. या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने समाजातील लहान मुलापासून वृद्ध मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी शरबत, खिचडी, रबडी आणि अन्य पदार्थांचे वाटपही करण्यात आले. या वर्षी 16 सप्टेंबर रोजी ईद मिलाद सण होता परंतु गणेश चतुर्थी असल्याने मिरवणूक कमिटीतील जेष्ठ नागरिकांनी लातूरची शांतता भंग होऊ नये आणि हिंदू मुस्लिम एकता कायम टिकून राहावी या हेतूने एक पाऊल मागे घेत गणेश विसर्जन झाल्यानंतर तीन दिवसाने म्हणजेच दिनांक 20 सप्टेंबर रोजी ही मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक गोलाई येथे आल्यानंतर मिरवणूकीचे मुस्लिम यंग योद्धा संघटना, शहीद अहेमद खान पठाण कृती समिती, वंचित बहुजन आघाडी, ऑल इंडिया मुस्लिम इत्तेहादूल मुस्लिमीन पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी , भारतीय जनता पार्टी आणि अन्य यांच्या वतीने मिरवणूकीचे स्वागत फुले उधळून करण्यात आले. भव्य दिव्य अशी ही मिरवणूक अतिशय शांततेत संपन्न झाली .


♦️मिरवणुक यशस्वी करण्यासाठी कमिटीचे अध्यक्ष महेबूब काझी, आवेज कुरेशी, अफजल कुरेशी, सर्फराज मणियार, कलीम रजा कुरेशी, उमरदराज खान, नविद सिद्दीकी आदींनी मेहनत घेतली.