लातूर:- लातूर येथील चिश्तीया कमिटी तर्फे ईद ए मिलादुन्नबी निमित्य याही वर्षी जेरे साया व करम पिरोमुर्शीद हजरत सय्यद बाकरअलीशाह चिस्ती अजमेर शरीफ यांच्या आशिर्वादाने दरुद शरीफ,फातिहा पठन करुन आजम गंजगोलाई लातूर येथे शुक्रवारी दि.२० रोजी सकाळी ११ वा.अन्नदान वाटपाला सुरवात करण्यात आली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज आजमगंज गोलाई या ठिकाणी लंगर ए आम (अन्नदान ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुस्लिम धर्मगुरू सोफिया मस्जिद चे इमाम मौलाना अहमद खान यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क ॲड.बळवंत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
♦️यावेळी महिला जिल्हा संपर्क प्रमुख कल्पनाताई बावगे , शिवसेनेचे शहर प्रमुख परवेजभाई पठाण, शिवसेनेचे उपशहर प्रमुख विजयकुमार कांबळे , लाडकी बहीण योजनेचे सदस्य सदाशिव गव्हाणे, उपशहर प्रमुख राजु बागवान, उपतालुका प्रमुख शाम साबळे, कामगार सेना तालुका प्रमुख शमशोद्दीन शेख, अकबर शेख, सर्फराज खाँनसाब, जुलुस कमिटीचे सदर महेबुब काझी , जुलुस कमिटीचे सचिव उमदराज खानसाब, मोहंमद गौस, अब्दुल रहीमशाह कादरी, चिस्तीया कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद साबिर भाई चिश्ती, अब्दुल्ला चिश्ती, नवाब चिश्ती, जुल्फेखार चिश्ती, समद चिश्ती, ज़मीर चिश्ती, विश्वनाथ पांचाळ महाराज, इम्रानशाह कादरी, सल्लाऊद्दीन कादरी, डाॅ.जुनेद, डाॅ.सादाब , सलिम सर, इलाही चिश्ती, सद्दाम चिश्ती, असलम चिश्ती, अफसर सर, मुनीर पठाण, कैफ चिश्ती, जलील खान, फारूख सय्यद आष्टा ,अजहर खान, साहिल मुशू, अमीन चिश्ती, जावेद पटेल, मौला शेख, आफताप पठाण, रिजवान शेख, अफरोज कुरेशी, कलिम बागवान आदींसह मान्यवर उपस्थित होते. हा सामजिक उपक्रम राबविले जात असल्याने सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.