अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथे उत्तरेश्वर सभा मंडपामध्ये शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज सायंकाळी 7 वाजता अहमदनगर येथील के पी प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा करंजी फेस्टिवल निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी करंजीसह परिसरातील सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन करंजी गावच्या सरपंच नसीम शेख यांनी केले आहे.
करंजीत रफिक शेख मित्र मंडळाच्यावतीने पहिल्यांदाच करंजी फेस्टिवल कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी जि.प.सदस्य राणीताई लंके,सोनालीताई तनपुरे,माजी जि.प.सदस्य प्रभावतीताई ढाकणे,योगिताताई राजळे,माजी जि.प.सदस्य उषाताई कराळे यांच्यासह विविध गावच्या सरपंच उपसरपंच प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना पैठणी साडी,सोन्याची नथ यासह विविध बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे.त्यामुळे या कार्यक्रमासाठी सर्व महिला भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सरपंच नसीम शेख यांनी केले आहे.त्याचबरोबर रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता कल्पना पाटील प्रस्तुत हिंदी,मराठी गीतांसह मनोरंजन मिमिक्री या आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा देखील करंजी ग्रामस्थांसह सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रफिक शेख मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.