♦️नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात जगत जननी गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार म्हणून धर्माबाद येथे श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा तर्फे गावाच्या मुख्य ठिकाणी पानसरे चौक येथे गोमातेचे पूजन व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
♦️आज महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब ,माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब व गो सेवा आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री शेखर मुंदडा साहेब यांनी गोमातेला राज्य मातेचा दर्जा प्राप्त करून दिला. गोमातेचे महत्त्व अनाधिकालापासून आहे त्यामुळे नित्य गोमातेची उपासना ही संत वांग्मयात सांगितली जाते गोमातेपासून मिळणारे दुध, गोमूत्र शरीरासाठी उपयुक्त असून, मानवी शरीराच्या आतील असणाऱ्या रोगापासून मुक्तीसाठी गोमूत्र व दूध हे लाभदायक आहे. सर्वत्र राज्यांमध्ये गोमातेची सेवा घडावी, शुद्ध दूध सर्वांना मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्य माता सन्मान दिल्याबद्दल श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा धर्माबाद तर्फे पानसरे चौक येथे गोमातेचे पूजन करून फटाके फोडून,महाराष्ट्र शासनाचे आभार मानले व सन्माननीय अध्यक्ष शेखरजी मुंदडा साहेब, श्री सुनीलजी सूर्यवंशी, श्री महेंद्र भाई संघोई सर , श्री गिरीश भाई शहा , श्री मिलिंद भाऊ एकबोटे व या कार्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या गोसेवा आयोगाच्या सर्व सदस्यांचे आभार मानून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या आनंद उत्सवात सर्व गोवत्स सेवेकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी माधव हानमंते नांदेड