हॉटेल मधील जेवणाचे बील देण्या वरून वेटरला मारहाण आरोपी विरोधात गुन्हा दाखल नान्नज बंदला संमिश्र प्रतिसाद
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील हॉटेल यश येथे जेवणाचे बील देण्यावरून झालेल्या भांडणात वेटरला झालेल्या मारहाणीमुळे नान्नज येथील तीन जणा विरोधातअनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्ह दाखल करण्यात आला असून दाखल गुन्हयातील आरोपीस त्वरीत अटक करावी या मागणीसाठी नान्नज येथील फिर्यादी महादेव साठे व मातंग समाज बांधव ग्रामस्थाच्या वतीने दि. १९ ऑक्टोबर रोजी नान्नज गाव बंद करण्याच्या संदर्भतील लेखी निवेदन प्रशासनास देऊन नान्नज गाव बंद पुकारण्यात आला होता तर हा वैयक्तीक वाद असून गाव बंद ठेऊन लोकास वेठीस धरु नये आणि गाव बंद करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन काही प्रतिस्पर्धी ग्रामस्थाच्या वतीने प्रशासनास देऊन गाव बंदला थांबवण्याच्या साठी विनंती करण्यात आली होती त्यामुळे काही काळ बंद च्या विनंतीला मानत छोट्या मोठ्या दुकानदारानी बंद ठेवला मात्र नान्नज ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन भोंगा गाडीतून ध्वनीक्षेपकातुन आदर्श आचार संहीता चालु असून गाव बंद ठेवता येणार नाही अस वारंवार जाहीर करण्यात आले त्यामुळे सर्व दुकानदार व्यापारी टपरी ठेलेवाले यांच्यात काही काळ संभ्रम निर्माण झाला असल्याने काही दुकाने बंद काही उघडी असा प्रकार घडला त्यातच महसूल प्रशासनाचे कामगार तलाठी प्रितम खाडे यांच्या वतीने आंदोलकास तहसिल प्रशासनाची बंद मागे घेण्याची नोटीस बजावण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सदर आंदोलकांनी तो आदेश न स्विकारता आंदोलनावर ठाम असल्याची भुमीका स्पष्ट केल्याने सदर आदेशाची प्रत कामगार तलाठी प्रितम खाडे व पंचाच्या समक्ष फिर्यादी साठे यांच्या घराला चिटकवण्यात आली तसेच परस्पर विरोधी दोन गट आमने सामने आल्याने काही काळ ग्रामस्थ लोकांमध्ये तणाव व संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे सकाळी दहा नंतर काही दुकाने चालु तर काही दुकाने बंद अशी परिस्थिती निर्माण झाली होती पोलीस यंत्रणा बंदोबस्ताला ठाम होती त्यामुळे कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही सर्वत्र तणावपूर्ण शांतता होती त्यामुळे नान्नज बंदला संमिश्र प्रतिसादात दिसून आला जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अ नगर
मो नं 9765886124