फुलचंद भगत
वाशिम : राज्यातील महायुती सरकारने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता संघटनेला न्याय देण्याची भूमिका स्विकारुन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने दिक्षाभूमी ते मंत्रालय या यात्रेचे फलीत म्हणून दोन स्वतंत्र्य महामंडळाची घोषणा कॅबीनेट बैठकीत केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमी सर्वसामान्य जनता व पत्रकारांच्या पाठीशी असून, आगामी विधानसभेमध्ये महायुतीचेच सरकार येणार असून, सरकार स्थापन होताच राज्यपाल नियुक्त आमदार कोट्यातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधीला आमदार करणार अशी स्पष्ट ग्वाही शिवसेना नेत्या विदर्भ कन्या आमदार भावना गवळी यांनी केली आहे.
स्थानिक रिसोड येथील संकट मोचन क्षिरसागर यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी वरील आश्वासन दिले आहे. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष समाजसेवक भगवानदादा क्षिरसागर, प्रमुख वक्ते मार्गदर्शक पत्रकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी, जिल्हाध्यक्ष निनादबापू देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुखम महादेवराव ठाकरे, भागवतराव गवळी, माजी नगराध्यक्ष किरण क्षिरसागर, पं.स. उपसभापती नरवाडे, शिवसेना शहराध्यक्ष अरुण मगर, रिसोड तालुकाध्यक्ष अरुण क्षिरसागर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष गणेश देगावकर, आरोग्य सेल जिल्हाध्यक्ष केशव गरकळ, शहराध्यक्ष प्रदिप खंडारे, सहसचिव प्रदिप देशमुख, रामेश्वर रंजवे, संतोष चोपडे, देवकर समवेत पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जो पत्रकाराच्या पाठीशी आम्ही त्यांच्या पाठीशी : निलेश सोमाणी
प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, यांच्या नेतृत्वात दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेमुळेच महायुती शासनाने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वतंत्र्य महामंडळाची घोषणा केली आहे. मात्र आता प्रत्यक्षात ही कृती साकार व्हावी, पत्रकारांना न्याय हक्क मिळावा, व राज्यपाल कोट्यातून पत्रकारांमधून एक आमदार प्रतिनिधी म्हणून घ्यावा, अशी मागणी विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी केली. जो पत्रकारांच्या पाठीशी राहील आम्ही त्याच्या पाठीशी राहू असे सांगून पत्रकार सुध्दा एक गठ्ठा मतदान असून, प्रत्येक मतदार संघामध्ये पत्रकार संघटनेची 20 हजार मतांची ताकद आहे असे सांगितले. आमदार भावना गवळी यांनी पत्रकारांमधून आमदार करण्याची घोषणा केल्याबद्दल संघटनेच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
कारंजा येथे बैठक उत्साहात
संपूर्ण राज्यामध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने प्रत्येक विधानसभा मतदार संघात बैठका घेण्यात येत आहेत. कारंजा विधानसभा मतदार संघातही बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी होते. बैठकीला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनिल फुलारी, तालुकाध्यक्ष किरण क्षार, नितीन वाणी, जिल्हा उपाध्यक्ष समीर देशपांडे, अमोल अघम, जेष्ठ पत्रकार संजय कडोळे, एकनाथ पवार, उमेश अनासने, मोहम्मद मुन्नीवाले, विनोद नंदागवळी, उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांनी ईच्छूक उमेदवार सईताई डहाके, गायक पाटणी यांची भेट घेवून चर्चा केली. प्रत्येक पक्ष व उमेदवारांनी आपल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मागणीचे समर्थन करुन आम्ही पत्रकारांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही द्यावी, अशी आग्रहाची मागणीही सोमाणी यांनी केली. यावेळी सर्व उमेदवारांनी सदर मागणी मान्य केली असून, जाहीरनाम्यामध्ये पत्रकारांच्या विषयाला प्राथमिकता देण्याचे आश्वासन दिले.
