5500/-रुपयाची लाच घेतांना रंगेहात अटक
फुलचंद भगत
वाशिम:-मालेगाव पंचायत समिती मार्फत दिल्या गेलेल्या सिंचन विहीरीच्या बांधकाम झाल्यावर तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेली सिंचन विहिरीच्या खर्चाची फाईल ऑनलाईन करून शासनाकडून रक्कम मिळवून देण्याकरिता लाच स्वीकारतांना आरोपी गजानन रतन इंगोले, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती कार्यालय मालेगाव यास लाच प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

मालेगाव तालुक्यातील सिंचन विहीर पूर्ण झाल्यावर फाईल ची कार्यवाही करून शासनाकडून खर्चाची रक्कम मिळवण्यासाठी ती फाईल ऑनलाईन करून देण्यासाठी तक्रारदार यास 6,000/-₹ ची लाचेची मागणी गजानन रतन इंगोले, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती कार्यालय यांनी केली होती. याची तक्रार वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. दि.23/10/2024 रोजी सापळा करवाई दरम्यान आलोसे इंगोले यांनी सदर फाईल ऑनलाईन करून शासनाकडून रक्कम मिळवून देण्याकरिता तडजोडीअंती 5,500/- रु. पंचायत समिती कार्यालय मालेगाव येथे स्विकारले. तक्रारदार यांचे कडून लाच रक्कम स्विकारली वरून आलोसे इंगोले यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पो.स्टे.मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई सापळा व तपास अधिकारी बालाजी तिप्पलवाड,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. वाशिम.सापळा मार्गदर्शक गजानन आर.शेळके,पोलीस उप अधीक्षक ला.प्र. वि.वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कार्यवाही पथक बालाजी तिप्पलवाड पोलीस निरीक्षक,पोहवालदार विनोद मार्कंडे ,आसिफ शेख, योगेश खोटे, चापोशि नाविद शेख ला.प्र.वि.वाशिम या पथकाने पंचायत समिती कार्यालयात करून सदर आरोपी मालेगाव पोलिस ठाण्यात वृत्त लिही पर्यंत सुरू होती.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206