आज सकाळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा फोन आला कोठारी साहेब खर्डा रोडवर एक बाई बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे ताबडतोब आणण्याची व्यवस्था करा संजय कोठारी हे आपली रुणवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांचा दहा-पंधरा पोलिसांचा स्टाफ तिथे हजर होता कोठारी यांनी त्या बाईस सरकारी दवाखान्यात दाखल केले ती स्वतः आपले नाव तनपुरे असून मी सोनई जिल्हा अहमदनगर येथील आहे असे सांगते तिची प्रकृती बरी आहे

तसेच दुपारी दीड वाजता खर्डा रोडवरील खेमानंद हायस्कूल समोर
एक मोटरसायकलचा अपघात झाला आहे अशी माहिती संदीप सांगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली कोठारी हे केवळ पाच मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन बाबू अनिल भोरे वय ४५ राहणार अंतरवली तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद त्या व्यक्तीस ताबडतोब आपल्या रुग्णवाहिकेत आणून खाजगी दवाखान्यात ऍडमिट केले आहे त्याला बराच मार लागला असून त्याच्यावर उपचार चालू आहे कोठारी हे पाच मिनिटात पोहोचल्यामुळे उपस्थितांनी कोठारी यांचे आभार मानले दवाखान्यात लवकर दाखल केल्यामुळे वेळीच उपचार झाल्यामुळे रुग्णाची तब्येत बरी आहे
सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड येथील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिली असून पुढील तपास चालू आहे

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
मो नं 9765876124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *