जामखेड तालुक्यातील खर्डा भागात डिगोळ ते खर्डा या महामार्ग चे काम अधुरे असल्याचे वंचित बहुजन आघाडी राज्याचे प्रवक्ते अँड.डॉ. अरुण जाधव यांच्या निदर्शनास आल्याने खर्डा परिसरातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटून दिघोळ ते खर्डा या रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत चर्चा केली आणि आंदोलन करण्याचे ठरवून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व खर्डा परिसरातील सर्व लोकांना घेऊन आंदोलन करून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावेळी जामखेड तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलना वेगळ्यावेगळ्या सामुदायातील लोक उपस्थित होते. त्यावेळी जामखेड तहसीलचे नायब तहसीलदार मा.भोसेकर साहेब यांनी म्हटले की लवकरात लवकर राहिलेले रस्ता तयार करून घेण्यात येईल तसेच त्या रस्त्याची ठेकेदार बोलून त्यांना सूचना केल्या होत्या. या बाबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा करून काम पूर्ण करणे बाबत माहिती घेतली आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश मिळाले असून रस्त्याचे काम चालू झाले असून सर्व खर्डा परिसरातील लोक अँड.डॉ. अरुण जाधव यांचे व वंचित बहुजन आघाडीचे कौतुक करत आहेत
. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्यप्रवक्ते अँड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. या आंदोलनासाठी आदिवासी नेते विशाल पवार, वंचित चे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, भीमराव सुरवसे, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, रेश्मा बागवान, द्वारका पवार, प्रदीप काळे, रोहिणी काळे, सलीम मदारी, हुसेन मदारी, तय्यब मुजावर, गणपत कराळे, दिपाली काळे, मुबारक मुजावर, बाबा मुजावर आदी उपस्थित होते.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी
9765886124