उद्धव ठाकरे वाशीमची रेकार्डब्रेक सभा
फुलचंद भगत
वाशिम:-माझ्या महाराष्ट्रासाठी मी लढणार म्हणजे लढणारच माझा महाराष्ट्र मी कुणाच्या घशात जाऊ देणार नाही. असे ठणकावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशिम येथील जाहीर सभेत सांगितले. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ देवळेसह काँग्रेसचे उमेदवार अमीत झनक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे उमेदवार ज्ञायक पाटणी या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आले होते.यावेळी पुढे बोलताना उध्दव ठाकरे यांनी मशाल ,हात व तुतारी वाजवणारा माणूस या तीन चिन्हा व्यतिरिक्त इतर कोणत्याही चिन्हाचा विचार करू नका असे आवाहन जनतेला केले.

यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये जो अंधार झाला आहे तो दूर करायला आपण मशाल घेऊन आलो,असल्याचे सांगून मागच्या वेळी तुम्ही खासदार संजय देशमुख निवडून दिलेत. आता जिल्हयातील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार निवडून द्या असे आवाहन केले. यावेळी मशाल हात आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह व्यतिरिक्त दुसरे चिन्ह चा विचार नाही म्हणजे नाहीच असे त्यांनी ठणकावून सांगितले मतदारांनो तुमची मोठी ताकत आहे ती ताकत कशानेही विकत घेऊ शकत नाही.असा सार्थ विश्वास त्यांनी दर्शविला. उदाहरण देताना विदर्भातील बैलपोळ्याला आपण आलो होतो आणि आपण बैलाला पुरणपोळीचा घास भरविला ते वातावरण किती प्रसन्न होते याची आठवण देत, पुढे एका बैलपोळ्याला बैलाचे पाठीवर लिहिलेलं होतं 50 खोके सब कुछ ओके “आणि आता एवढ्यातच एका बैलाचा फोटो पाहिला त्या फोटोवर “सोयाबीनला भाव नाही भाजपाला मत नाही असे लिहीलेले असल्याचे सांगितले .शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून गेलेल्यांनाही त्यांनी अप्रत्यक्षपणे फाईलवर घेतले. भ्रष्टाचाराचा प्रचंड आरोप होता मात्र राखी बांधल्यानंतर ते सारे कसे स्वच्छ झाले असा प्रश्न केला तसेच त्यांना विधान परिषदेवर घेतले तरी त्या या निवडणुकीत त्या राहिल्यात त्या पडणार म्हणजे पडणारच असे रोखठोकपणे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. वाशिम मध्ये आपल्याला यावेळी मशाल आणावी लागणार म्हणजे लागणारअसे आवाहन त्यांनी केले यावेळी त्यांनी हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर प्रशासनाने त्यांची बॅग तपासणी याबाबत बोलताना त्यांनी आचार संहिता आम्हीच पाळायचा का?असा खोचक सवाल प्रशासकीय यंत्रणावर केला अश्या सत्ताधाऱ्यांना बॅग तपासल्या जातात काय?असा प्रतिप्रश्न केला.आमची शिवसेना चोरली,आमचा शिवसेना पक्ष चोरला आमचे शिवसेना नावही चोरले आणि आता पक्ष संपवायला निघालात ,आणि आता महाराष्ट्र संपू देणार नाही म्हणजे नाही असे त्याने ठणकावून सांगितले नांदेड मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उल्लेखावर सडाडुन टिका करताना मोदीजी विश्वगुरू तुम्ही मात्र तुम्ही माझ्या वडिलांचे नावाने भुताचा जोगवा मागितला यावर त्यांनी कोटी केली .यावेळी जनतेला आवाहन करताना मागच्या वेळी आलो होतो तुम्ही संजय देशमुख यांना विजय करण्याचा ठरवलं होतं तेव्हा आता डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना विजयी करण्याबाबत ठरलय का? असा प्रश्न विचारला तेव्हा जनतेने ठरलंय असे उत्तर दीले. आपण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार म्हणजे लढणार आहेत आता शब्द त्यांनी यावेळी दिला याप्रसंगी महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ देवळे, काँग्रेसचे रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कारंजाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नायक पाटणी यांनी केले यावेळी न्यायक पाटील यांनी बोलताना वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघात अतिशय प्रामाणिक माणूस मिळालेला आहे तेव्हा माझ्यासोबत राहणाऱ्या मंडळींना स्वर्गीय राजेंद्र पाटणे यांना श्रद्धास्थानी मानणाऱ्या व आमचेवर प्रेम करणाऱ्या मंडळींना शक्य होईल तेवढी मदत डॉ.सिध्दार्थ देवळे यांना होईल अशी ग्वाही दिली.यावेळी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख दिलीपराव जाधव, खासदार संजय देशमुख,जिल्हाप्रमुख सूरेश मापारी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.सुधीर कव्हर,बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष माणिकराव गंगावणे, शेतकरी संघटनेचे विदर्भ नेते दामू अण्णा इंगोले, माजी नगरसेवक फारुख भाई, काँग्रेस पक्षाचे पी.पी .अंभोरे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील,ओबीसी चे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ सानप, मंगरूळपीर नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष गजाला खान, वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे सहअनेक मान्यवरांची भाषणे झाली. वरील मान्यवरांसोबतच मंचावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा संघटक प्रशांत सुर्वे, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख ,आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले, काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव दिलीपराव सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे पाटील ,माजी न.प. उपाध्यक्ष माधवराव अंभोरे ,तालुकाध्यक्ष रमेश गोटे, मंगरूळपीर तालुकाध्यक्ष राजेश टोपले पाटील, काँग्रेस पक्षाचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेव सोळंके मंगरूळपीर तालुकाध्यक्ष दिलीप मोहनावाले काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शंकर वानखेडे युवक काँग्रेसचे वाशिम तालुका अध्यक्ष नयन करे ,माजी जि. प. अध्यक्ष दिलीपराव देशमुख, निवासी उपजिल्हाप्रमुख माणीकराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य दत्ता पाटील तुरक ,माजी नगरसेवक सुरेश कदम उपजिल्हाप्रमुख रवी पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष किरण मंगलाताई सरनाईक,
वाशिम शहराध्यक्ष रंजना पारीसकर वाशिम तालुका प्रमुख रामदास मते पाटील ,शहर प्रमुख गजाननराव भांदुर्गे ,मंगरूळपीर तालुकाप्रमुख रामदास पाटील सुर्वे ,शहर प्रमुख सचिन परळीकर रिसोड तालुकाप्रमुख नारायणराव आरू तालुकाप्रमुख तालुकाप्रमुख उद्धवराव गोडे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मडके वासिम शहर प्रमुख आशिष इंगोले सुशील भिमजीयाणी आणि युवती सेना जिल्हाध्यक्ष प्रियाताई महाजन यांचे सह अनेकांची मंचावर उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन बालाजी वानखेडे यांनी केले.आजतागायत झालेल्या सर्व सभांचे रेकार्ड तोडणारी रैकार्ड ब्रेक ही सभा झाली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206