त्याच दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन कार्यक्रम आयोजित केला *
आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण करण्यात आले. तसेच मुलींना कौशल्य विकास शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्यांनी स्वावलंबी व्हावे. त्यासाठी आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे. असे मत विविध विद्यार्थिनींनी आपल्या भाषणात व्यक्त केले. प्लॅनेट आय टी मध्ये सारथी च्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मधील विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी सुप्रिया चांदेकर, नेहा ढवंगळे, प्रचिता सायरे, नम्रता पिंपळे, हर्ष पाटील, तुषार बिसेन, देविका चीपडे, वेदांती चरपे, संजना वाडबुढे, ईश्वरी लोडेकर, भाग्यश्री चाफेकर, नताशा देशमुख, काजल गहरवार, नम्रता घ्यार, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन हर्ष पाटील आणि आभार प्रदर्शन प्लॅनेट आय टी चे समन्वयक गीता गुप्ता यांनी केले.
प्रतिनिधि मंगेश उराड़े नागपुर