श्रीरामपूर ते नेवासा रस्त्यावर शेतमजुरास लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपासकामी नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


अक्षय दादासाहेब गांगुर्डे, (वय २८, रा.संजयनगर, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदार सुभाष उर्फ भावडया दिलीप शिंदे, (रा.बहीरवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर) व इतर एक अनोळखी (फरार) यांच्या सोबत केला असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली.