♦️प्रतिनिधी: बारामती: दि. २५/ सिमा शरद मुसळे रा. तांदुळवाडी, ता. बारामती जि. पुणे यांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यामुळे व त्रास झाल्यामुळे त्यांनी दि. २३/०१/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजलेपासुन मा. प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत. तसेच सदर उपोषण करून न्याय न मिळाल्यास दि. २६/१०/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे दिलेला आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही अजूनही प्रशासनाने कुठलेही ठोस पाऊल उचललेले नाही जर खरंच सीमा मुसळे यांनी आत्मदहन केले तर याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असे मत सीमा मुसळे यांनी यावेळी सांगितले.
♦️सदर प्रकार असा की अक्षय अडागळे यांनी सीमा मुसळे यांना त्यांच्या दुकानी जाऊन दमदाटी केली म्हणून सीमा मुसळे यांनी अक्षय अडागळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यामुळे अक्षय अडगळे याला वाचवण्यासाठी त्याची आई मंगल वसंत अडागळे यांनी सीमा मुसळे यांचा मुलगा व त्यांच्या बहीणीचा मुलगा यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल केली. परंतु पोलिसांनी सिमा मुसळे यांच्या तक्रारीची कुठलीही दखल न घेता सिमा मुसळे यांना कोणतीही मदत केले नाही. सीमा मुसळे यांच्याकडे अक्षय अडागळे यांच्या विरोधात दमदाटी केलेले ठोस पुरावे असून सुद्धा पोलिसांनी सीमा मुसळे यांना मदत न करता सदर प्रकाराची शहानिशा न करता त्यांच्याच मुलांवर ॲट्रॉसिटी दाखल करून घेतली. सीमा मुसळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी अक्षय आडगळे यांच्यावर कोणतेही कारवाई केली नाही. उलट सीमा मुसळे यांच्या मुलांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये व आपल्या जीवितास व मुलांच्या जीवितात कोणतीही हाणी होऊ नये म्हणून सीमा मुसळे यांनी प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण व आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. पोलीस यंत्रणेने जर सत्य शोधण्याचा प्रयत्न केला असता, सदर प्रकाराच्या मुळाशी जाऊन शोध घेतला असता तर आज सीमा मुसळे यांच्यावर ही वेळ आली नसती. सिमा मुसळे यांचा कुठेतरी पोलीस यंत्रणा व प्रशासन यांच्यावरील विश्वास उठल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
♦️सीमा मुसळे यांनी रविंद्र एकनाथ माकर, सुरेंद्र काजळे, रविंद एकनाथ माकर व त्यांचे साथीदार रोहन राजेंद्र चव्हाण, अभिजित खराडे, संभाजी चव्हाण, अक्षय वसंत अडागळे, यांच्यावर आर्थिक व्यवहाराच्या वादातून गुन्हा दाखल केला होता तरी सिम मुसळे यांच्यावर सदर गुन्हा माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. व त्यांनी वरील व्यक्तींवरील गुन्हा माघारी घ्यावा म्हणून सिमा मुसळे व त्यांच्या बहिणीचा मुलगा यांच्यावर वरील व्यक्तींनी त्यांच्या संबंधित निकटवर्तीयांकडुन ऍट्रॉसिटी दाखल केली आहे. सीमा मुसळे यांना त्यांच्या दुकाने जाऊन दमदाटी करणारे अक्षय अडागळे व सीमा मुसळे यांच्या व त्यांच्या बहिणीच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल करणाऱ्या मंगल वसंत आढागळे हे वरील व्यक्तींचे निकटवर्ती आहेत.
♦️सिमा मुसळे यांच्याकडे वरील सर्वांन विरोधात ठोस पुरावे आहेत व मंगल वसंत आढागळे यांनी जी ॲट्रॉसिटी सीमा मुसळे यांच्या मुलांवर दाखल केली आहे ती किती चुकीची आहे व खोटी आहे याचेही सीमा मुसळे यांच्याकडे पूर्ण पुरावे आहेत, तरीही पोलीस यंत्रणा कुठलाही तपास करत नाहीत. पोलीस यंत्रणेने आत्तापर्यंत कुठलाही ठोस पुरावा पाहिलेला नाही किंवा जातीने तपास केला नाही. व चुकीच्या गोष्टीला समर्थन देत आहेत. तरी आपल्या व आपल्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये व आपल्या आपल्या मुलांना कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून तसेच प्रशासनाकडुन आपल्याला कुठलीही मदत मिळत नाही व न्याय मिळत नाही या सर्व त्रासाला कंटाळून सीमा मुसळे यांनी आमरण उपोषण व आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे.
♦️मंगल वसंत अडागळे यांनी एफ. आय आर नं. ००१५ मधील माझ्या मुलावरती व माझ्या बहिणीचा मुलगा संदिप बागले यांच्यावर खोटा अ़ॅट्रोसिटीचा गुन्हयात कोणतीही चौकशी न करता खोटा गुन्हा दाखल करून माझ्या मुलांना अडकविण्याचा प्रयन सदर अक्षय अडागळे व त्याची आई करित आहे तरी सदर दाखल गुन्हयाची चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही करावी. जेणेकरून माझ्या सुशिक्षीत मुलांचे करियर खराब होणार नाही. व सदर गुन्हयाच्या तपासकामासाठी सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. असे सिमा मुसळे यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
♦️मला न्याय मिळविण्यासाठी मी संविधानिक मार्गाने गुरवार दिनांक २३/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजलेपासुन आमरण उपोषण करीत आहे. याची प्रशासनाने दाद घ्यावी. मला न्याय मिळाला नाही तर २६/०१/२०२५ रोजी स. १६ वाजता मा. प्रांताधिकारी सो. बारामती यांच्या कार्यालयासमोर आपण आत्मदहन करणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
♦️सदर उपोषणाचे पत्र दिल्यानंतर माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणे तसेच मुलांना व मला अटक करण्याचे प्रयल होऊ शकतात म्हणुन गुन्हा दाखल करण्याअगोदर प्राथमिक चौकशी करण्यात यावी ही विनंती सीमा मुसळे यांनी प्रशासनाकडे केले आहे. मला व माझ्या मुलाला तसेच बहिणीचा मुलगा संदिप बागल यांना अटक केल्यानंतर आमच्या जीवितास काही बरे वाईट किंवा जीवितहानी झाल्यास यास सर्वस्वी पोलिस प्रशासन व पत्रात नमुद सर्व इसम राहतील याची नोंद प्रशासनाने घ्यावी.
♦️सदर निवेदन खालील ठिकाणी देण्यात आले आहे. १. मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, २. मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ३. मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य. ४. मा. सुप्रियाताई सुळे, खासदार बारामती ५. मा. तहसिलदार, बारामती, पुणे ६. मा. पोलिस निरिक्षक, बारामती