♦️येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)-

♦️कळंब तालुक्यातील मलकापूर येथे रेशीमउद्योग नोंदणी व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेशीम विकास अधिकारी वाकुरे मॅडम यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला . रेशीम महाअभियान २०२५ अंतर्गत मलकापूर येथे रेशीम नोंदणी व रेशीम लागवडी विषयीचे मार्गदर्शन ग्रामपंचायत कार्यालय येथे दि . ४ रोजी शेतकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला . सदरील कार्यक्रमात रेशीम विकास अधिकारी श्रेणी- १ श्रीमती ए.व्ही .वाकुरे मॅडम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रेशीम उद्योग बाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले . एक एकर क्षेत्रामध्ये रेशीम लागवड केल्यास ४ लाखा १८ हजारापर्यंत अनुदान असुन त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती, नोंदणी कुठे करायची याबाबतची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली गेली . त्यांनतर जुने लाभार्थी शेतकरी सुनिल लोमटे, तानाजी लोमटे, कोळी, सय्यद, यांनी रेशीम उद्योग करताना येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांच्या समोर मांडून त्यांचे निरसन करून घेतले .

♦️रेशीम विक्रीसाठी परराज्यात जाण्याऐवजी धाराशिव जिल्ह्याच्या जवळ असलेल्या बीड व जालना येथील शासकिय रेशीम बाजारपेठे बाबत माहिती दिली .नवीन रेशीम उद्योग लाभार्थी प्रताप लोमटे,लाभार्थी सुनिल लोमटे यांच्या तुती लागवडीची शेतात जाऊन पाहणी केली .या कार्यक्रमास वरिष्ठ सहाय्यक सुरेंद्र सुर्यवंशी, तांत्रिक सहाय्यक संदिप पवार, शेतकरी सुंदर लोमटे, तानाजी लोमटे , हनुमंत पवार, सुधीर पायाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुंदर लोमटे यांनी केले तर आभारप्रदर्शन सुधीर पायाळे यांनी केले