आज दिनांक 5फेब्रुवारी 2025 वार बुधवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील रहिवासी असलेली अल्पभूधारक शेतकरी रंगनाथ तुकाराम पाटील तांगडे यांचे काल दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले, रंगनाथ पाटील तांगडे हे काही दिवसापासून आजारी होते यावेळी त्यांना आजारपणातून बरे करण्यासाठी त्यांची पत्नी मंगलाबाई रंगनाथ तांगडे या दिवस-रात्र एक करत त्यांच्यावर उपचार करत होत्या शेवटी व त्याचे नव्हते झाले व काल सकाळी 10 वाजेच्या सुमारास रंगनाथ तांगडे यांनी या जगाचा निरोप घेतला व या थरथर त्या हाताने आपल्या पतीला जीवनसाथीला या महिलेने अखेरचा निरोप दिला, अंत्यविधी हिंदूरिती रिवाजाप्रमाणे वडोद तांगडा येथे स्मशानभूमीत पार पडला सर्व नातेवाईक संपूर्ण गाव एकत्र येत दुःखद वातावरणामध्ये हा अंत्यविधी पार पडला, अंत्यविधी पार पडल्याच्या काही तासातच अचानक मंगलाबाई रंगनाथ तांगडे यांची तब्येत खालावली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना सिल्लोड येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी गाडी घेऊन सिल्लोडच्या दिशेने रवाना झाली. मात्र पालोद या गावाविषयी जाताच मंगलाबाई रंगनाथ तांगडे यांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला, ज्या जीवनसाथी बरोबर वयाचे 40-50 वर्ष संसाराचा गाडा हाकलण्यात खांद्याला खांदा लावून चालल्या त्याच जीवनसाथीच्या खांद्याला खांदा लावून मंगलाबाई रंगनाथ तांगडे यांनी सुद्धा प्राण त्यागले व या जगाचा निरोप घेतला, ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली परिसरात पसरली या बातमीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून यावेळी रंगनाथ पाटील तांगडे यांचे वय 65 वर्ष तर मंगलाबाई रंगनाथ तांगडे यांचे वय 60 वर्षे होते या वयोरुद्ध दापत्याच्या या पाश्चात चार मुली एक मुलगा सून नातवंडे पुतने दिर भावजय असा मोठा परिवार आहे आज अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये मंगलाबाई रंगनाथ तांगडे यांच्यावर सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.. या धावपळीच्या युगातही या माऊलीने आपल्या पतीला कुठल्याही हट्टासाठी त्रास दिला नाही कुठलाही हट्ट केला नाही हट्ट केला फक्त जीवन जगण्याचा आणि तो अपूर्ण राहिल्यामुळे या मायमाऊलीने सुद्धा या जगाचा निरोप घेतला..

प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन जालना