(सचिन बिद्री:उमरगा)
महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत धाराशीव जिल्ह्याच्या प्राचार्य प्रवर्तक पदी डॉ.संजय अस्वले यांची निवड झाली.
उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणुन डॉ अस्वले कार्यरत आहेत. त्यानी करिअर कट्ट्याचे महाविद्यालयीन समन्वयक आणि धाराशीव जिल्ह्याचे समन्वयक म्हणुन गेली तीन वर्षे महाविद्यालया बरोबरच संपूर्ण जिल्ह्यात करिअर कट्टा विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आहे.आपल्या महाविद्यालयास एक्सेलन्स सेंटर ए प्लस दर्जा मिळवून देण्यात त्यांचे योगदान आहे.तसेच महाविद्यालयीन पातळीवर संपूर्ण जिल्ह्यात विद्यार्थी संसद स्थापन करण्यात पुढाकार घेतला.याबद्दल गेली तीन वर्षे त्यांना उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणुन गौरवण्यात आल़े आहे.या कार्याची दखल घेऊन करिअर कट्ट्याचे प्रमुख श्री यशवंत शितोळे यानी त्यांना प्राचार्य प्रवर्तक म्हणुन निवड झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या करिअर कट्टा पोलिस अकॅडमी,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मधील विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, डॉ विनोद देवरकर, करिअर कट्टा समन्वयक डॉ एस पी पसरकल्ले डॉ ए के कटके, डॉ सी.डी. करे, डॉ ए एस पदमपल्ले प्रा. आशिष घंटे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
सूत्र संचालन प्रज्वल पवार आणि आभार प्रदर्शन डॉ ए के कटके यानी केले.