WASHIM | सध्या बेरोजगारीची समस्येचा राक्षस दिवसेंदिवस वाढत असुन याला आळा घालण्यासाठी युवक युवतींना आपल्या स्किलनुसार रोजगार प्राप्त होणे महत्वाचे आहे जेणेकरुन त्यांच्या जीवनाच्या करीअरचा प्रश्न सुटेल.हाच ऊदात्त हेतु घेवुन यहोवा यिरे फाऊंडेशनच्या माध्यमातुन चिमुर येथे भव्य रोजगार मेळावा,ऊद्दोगरत्न पुरस्कार आणी समुहनृत्य कार्यक्रमाचे आयोजन दि.५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.बेरोजगारांना रोजगारीची दालने ऊपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सदैव कटिबध्द असल्याचे मत यावेळी डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांनी व्यक्त केले.

एन टिव्ही न्युज मराठी चॅनलचे ब्युरोचिफ पञकार व सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ऊत्कृष्ट पञकारीतेसाठी गौरवचिन्ह देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यहोवा यिरे फाउंडेशन च्या वतीने रोजगार मार्गदर्शन मेळावा आणि उधोग रत्न पुरस्कार आणि सांस्कृतिक गट नृत्य स्पर्धा दि.५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आल्या यावेळी चिमूर तहसील च्या पी एस आय ऑफिसर दिप्ती मरकाम यांच्या हस्ते ऊद्दोगरत्न पुरस्काराने मान्यवरांना सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ तसेच सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यहोवा यिरे फाऊंडेशन व कलाजीवन बहुउद्देशीय संस्था व पर्यावरण संवर्धन व विकास समिती या तिनी ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाचा उद्देश सामाजिक कार्य क्षेञात चांगले काम करत असलेले व व्यावसायिक क्षेत्रात मध्ये खुप मेहनत करत असलेल्यांना प्लाॅटफार्म मिळेल या उद्देशातून या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाऊणे म्हणून पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम, मराठी अभिनेञी महाराष्ट्र लावणी क्वीन शिल्फा शाहीर, महाराष्ट्र उधोजक प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर चे प्रोजेक्ट ऑफिसर संदीप जाने, दलित मित्र व आदीवासी सेवक जेष्ठ पत्रकार श्री.डी.के आरीकर, सामाजिक कार्यकर्ते व पञकार फुलचंद दैनिक राज आनंद अहमदनगर चे संपादक विठ्ठल शिंदे पर्यावरण संवर्धन व विकास समीती महाराष्ट्र प्रदेश चे उपाअध्यक्ष डाॅ.रमेशकुमार बोरकुटे सहकार क्षेत्र चंद्रपूर जिल्ह्य़ाचे ऑडिटर राहुल जोगी,एलिजा बोरकुटे यांच्या हस्ते उपस्थितीत १२९ सामाजिक कार्य व उद्दोजकांना ना बेस्ट शोषल वर्क व उद्दोग रत्न पुरस्कार देऊन सम्मान चिन्ह व सर्टीफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम दि.५ फेबुवारी ला बालाजी रायपुरकर सभागृह हाॅल चिमुर येथे मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.भविष्यातही युवकांना रोजगारांच्या नवनव्या संधी ऊपलब्ध करुन देण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन रोजगाराची दारे खुली करण्याचा मानस यहोवा यिरे फाउंडेशनचे डाॅ.रमेशकुमार बोरकुटे यांनी सांगीतले.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206