♦️सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा साताराच्या वतीने मान्यवरांचा सन्मान व जिल्ह्यातील संपादक पत्रकार बंधू-भगिनींसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दि. १ मार्च रोजी करण्यात आले आहे. सकाळी दहा ते चार या वेळेत सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी सातारा जिल्ह्यातील नवनियुक्त मंत्रिमहोदय यांचा सन्मान करण्यात येणार आहे व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष, माध्यमतज्ञ, ज्येष्ठ पत्रकार राजा माने साहेब यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात येणार आहेत.


♦️पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा सातारा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई हे कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती वर्षा पाटोळे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य समन्वयक तेजस राऊत, राज्य सचिव महेश कुगावकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी, राज्य अध्यक्ष साप्ताहिक संघटना संजय कदम, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे हे उपस्थित राहणार आहेत.


♦️डिजिटल पत्रकारांची दिशा पुढील काळात कशी असावी याबाबत मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे. पत्रकारितेची मूल्य आणि पत्रकार म्हणून असणारी सामाजिक जबाबदारी याबाबत चर्चा या कार्यशाळेत होईल. डिजिटल पत्रकारांना मान्यता मिळवण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना काय काम करत आहे याबाबत माहिती कार्यशाळेत देण्यात येईल. डिजिटल पत्रकार म्हणून कशी वाटचाल करावी लागेल याची दिशा या कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चित मिळेल. तरी जिल्ह्यातील संपादक पत्रकार बांधवांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, सातारा शहराध्यक्ष अजित सोनवणे यांनी केले आहे.