येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे ) –

♦️येथील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा १२ एप्रिल पासून सुरू होत असून त्याअनुषंगाने यात्रेच्या पूर्व तयारी साठी प्रशासनाने १७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन केले असून विविध प्रशासकीय विभागांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश तहसीलदार हेमंत ढोकले दिले आहेत.


येरमाळा येथील तुळजभवानीची धाकटी बहीण म्हणून राज्यात प्रसिद्ध आराध्य दैवत असलेल्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा १२ एप्रिल पासुन प्रारंभ होत आहे सदरील कालावधीत कायदा व सुव्यवस्था व इतर नियोजनासाठी शुक्रवार (दि.१७) रोजी दुपारी २ वा. मा संजय पाटील (उपविभागीय दंडाधिकारी कळंब) यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा येथे प्रशासकीय यात्रा नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब,कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग, धाराशिव, उपविभागीय अभियंता, सा. बां. वि कळंब,कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग धाराशिव,उपविभागीय अभियता जि. प बांधकाम कळंब,उपविभागीय अभियंता, म. रा. वि. वि. कंपनी कळंब,कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग धाराशिव,उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे कळंब,जिल्हा वाहतुक नियंत्रक अधिकारी, धाराशिव,डेपो मॅनेजर. म.रा.प.म. कळंब,कार्यकारी अभियंता, जि. प. पाणीपुरवठा विभाग, धाराशिव, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, धाराशिव ,सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन येरमाळा,तालुका कृषी अधिकारी, कळंब, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, धाराशिव,मंडळ अधिकारी येरमाळा,तलाठी सज्जा येरमाळा,सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, येरमाळा,अध्यक्ष, श्री येडेश्वरी देवस्थान समिती, येरमाळा,जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. धाराशिव,तालुका आरोग्य अधिकारी, कळंब,मुख्याधिकारी, नगर परिषद, कळंब (अग्निशामक प्रमुख),गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कळंब,प्रकल्प संचालक, मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, मस्सा खं. ता कळंब,जिल्हा पशुवैदयकीय अधिकारी, धाराशिव,अध्यक्ष, पत्रकार संघ, येरमाळा, प्रकल्प संचालक, आय.आर.बी. कंपनी गडपाटी, धाराशिव पंचायत समिती कार्यालयासह यात्रा सबंधित सदरील बैठकीस आवश्यक त्या माहितीसह सबंधित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहावे,असे आदेश कळंब तहसील कार्यालयाने दिले व विविध प्रशासकीय कार्यालयाना देण्यात आले आहेत तरी या नियोजन बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.