दोन अल्पवयिन मूलीना उत्तर प्रदेश मद्दे घेव्यून जान्याचे कारस्थान रेचले
या आरोपीना खापा पोलीसानी अटक केली
सावनेर तालुक्यातील खापा येथें पुण्यात डान्स ग्रुपमध्ये सहभागी करुन देण्याचे आमिष दाखवून खापा शहरातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून आरोपी तरूणांनी उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचे कारस्थान रचले.
पण आरोपींचा डाव फसला. या
आरोपींना खापा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून चारही मुलींची सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार खापा
शहरातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पुण्यात डान्स ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे आमिष दाखवत उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचा डाव रचला. 20 मार्च रोजी
दोन्ही मुली आरोपींच्या जाळ्यात
अडकल्या आणि त्यांच्या कुटुंबियांना
न कळवता त्यांच्यासोबत निघूनगेल्या. खूप शोध घेतल्यानंतर कुटुंबाने २१ मार्च
रोजी पहाटे ३ वाजता खापा पोलिस
ठाण्यात दोघांचीही बेपत्ता झाल्याची
तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खापा
पोलिसांनी तातडीने मुलींचा शोध सुरू
केला.
सायबर पोलिसांच्या मदतीने जेव्हा
दोन्ही किशोरांपैकी एकाचा मोबाईल
नंबर ट्रेस करण्यात आला तेव्हा ते दोघेही उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील जौनपूरमध्ये असल्याची असल्याची माहिती मिळाली. २२ तारखेला सकाळी नागपूर
ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार
यांच्या नेतृत्वाखाली सावनेरपोलिसांचे
उपविभागीय अधिकारी अनिल मस्के
आणि खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार
विशाल गिरी यांच्या मार्गदर्शनात
एपीआय कृणाल रामटेके, हवालदार
पंकज ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबलराहुल रेवतकर हे उत्तर प्रदेशला रवाना झाले. रामपूरमध्ये पोहोचताच,उत्तरप्रदेशच्या
स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलींचा
शोध घेण्यात आला. २३ मार्च रोजी
खापा पोलिसांनी दोघांचीही सुटका
केली. तपासादरम्यान असे आढळून
आले की आरोपीने खापा येथील दोन
मुलींना तसेच गडचिरोली येथील दोन
मुलींना आमिष दाखवून उत्तर प्रदेशात
नेले होते. खापा पोलिसांनी त्यांनाही
वाचवले. अशाप्रकारे खापा पोलिसांनी
आरोपींच्या तावडीतून ४ मुलींची
सुटका केली. आरोपींमध्ये सत्यपाल
कवडू बनारसे (३५, ताडगाव, तहसील अर्जुनी मोरगाव) आणि अतुल श्रीराम बनारसे (३१, आमगाव तहसील.वडसा जिल्हा गडचिरोली) येथील रहिवाशांचा समावेश आहे. प्रतिनिधि मंगेश उराडे एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर