JALGAON | चारित्र्याच्या संशयातून पतीने आपली पत्नी झोपेत असतानाच तिचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शितल सोमनाथ सोनवणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमनाथ सोनवणे याने चारित्र्याच्या संशयातून पत्नी शितल हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा निर्घृण खून केला. या घटनेत दहा वर्षांचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला आहे. मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात घडली.

सोमनाथ सोनवणे हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीवर संशय घेत होता. नातेवाईकांनी समजावल्यानंतरही त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जात नव्हते. रात्री त्याने मोठ्या प्रमाणात दारू सेवन केली आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास शितल झोपेत असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात शितल गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी सोमनाथ सोनवणे यास गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत.

जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *