दि.14/04/2025 रोजी खर्डा येथे भटके विमुक्त अधिवासी समुदायाच्या पालावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य यांची जयंती पार पडली. या जयंतीनिमित्त प्रबोधन मेळामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खर्डा येथील पोलीस सहाय्यक निरीक्षक विजय झंजाड साहेब होते. ते म्हणाले की, भटके विमुक्त आदिवासी समुदायांनी गुरु शिष्य जयंती मेळावा घेण्यात आला असा प्रबोधन मेळावा प्रत्येक समुदायांनी घेतला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये समता, बंधुता, न्याय , स्वातंत्र्य हे मूल्य संविधानिक व महापुरुषांच्या विचारांमधून सर्व लोकांपर्यंत पोहोच होतील हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून एड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की मी पण भटके विमुक्त या समुदायामधूनच आहे मी पण तुमचाच तीन दगडाच्या चूलीचा भाऊबंद आहे. म्हणून तुम्ही आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. मी पण नसतो शिकलो तर माझी पण अवस्था पालामध्येच दिसली असती. माझा जन्मच कष्टकरी शेतकरी, वंचित घटकांसाठी झाला आहे. माझे पुढचे आयुष्य सुद्धा तुमच्या अधिकारासाठीच लढत जाणार आहे.

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून म्हणून प्रवीण रणबागुल म्हणाले की, आपल्याला जे समजले नाही ते भटके विमुक्तांना समजले. गुरु शिष्याची जयंती संकल्पना ही जयंती सादरी करणे म्हणजे गर्वाची बाब आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विजयसिंह गोलेकर म्हणाले की ग्रामीण विकास केंद्र ही संस्था फक्त भटके विमुक्त अदिवासी समुदायासोबत काम करत नाही तर प्रत्येक नागरिक असो किंवा वंचित घटक असोत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ही संस्था सतत करत असते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच पत्रकार दत्तराज पवार, मार्केट समितीचे संचालक वैजनाथ पाटील,पत्रकार संतोष थोरात, साहित्यिक गोकुळ गायकवाड, डॉ. सोपान गोपाळघरे, डॉ बिपिनचंद्र लाड, पत्रकार धनसिंग साळुंके, शाहीर बाळासाहेब हे सर्व प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रबोधन करत तसेच शिक्षणा साठी आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा शिंगांणे यांनी तर प्रस्तावना विशाल पवार यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सूचना नीता इंगळे यांनी केली तर उर्मिला कवडे यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे समारोप व आभार मंगल शिंगाणे यांनी मानले. हा कार्यक्रम ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्र या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी भीमराव सुरवसे, रेश्मा बागवान , मच्छिंद्र जाधव, शहानुर काळे ,फकीर मदारी, सरदार मदारी, सलीम मदारी, मुस्तफा मदारी, शोभा ठोकळे, सुनिता कांबळे, रुकसाना मापाडी आदी उपस्थित होते.
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124