बारामती : ब्रेकिंग
बारामती तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार बारामती तालुक्यातील 'मूर्टी' या गावातून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत घाणेरडा प्रकार समोर आलाय. सुपे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या काही मिनिटातच आरोपी ताब्यात घेण्यात आलाय. या घटनेत पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलेय. बारामती तालुक्यात आज घडलेली ही अत्यंत वेदनादायक तसेच माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल. अठरा विश्व दारिद्र्याने गरिबीला जखडलेल्या समाजातील सात ते आठ वयोगटाच्या अल्पवयीन पिढीत मुलगी या अत्याचाराचा बळी ठरली आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव आणि मुर्टी या दोन गावांच्या मध्य भागात घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. चिरेखन वाडी नजीक वाघाळे येथे शेती कामासाठी आलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हर इसमाने अ नैसर्गिक कृत्य केल्याची चर्चा आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच 'सुपा' पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पोचले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असली तरी ? सुपे पोलिसांच्या तत्पुरतेमुळे संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज कुमार नवसारे यांच्या मार्गदर्शनानुसार मोरगाव पोलीस मदत केंद्रातील पोलीस नाईक राहुल भाग्यवंत तसेच पोलीस उपनिरीक्षक जिग्नेश कोळी व पोलीस ठाण्यातील पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित मुलीला उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्याचा निर्णय घेतला. या प्रकाराबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याची संपर्क साधला मात्र ; याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नाही. याप्रकरणी कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात आले.