मंगरुळपीर
कुठलीही आपत्ती आल्यास तत्परतेने व निस्वार्थी भावनेने मदतीसाठी धावुन जाणारे आणि कित्येकांचे जीव वाचवुन देवदुत बनलेले संत गाडगेबाबा आपत्ती निवारण व बचाव पथक, पिंजर शाखा, मंगरुळपीर यांना अत्यावश्यक उपयोगात येणारी दोन वाॅकीटाॅकी सिध्दार्थ विद्यालयाचे १९९७ च्या बॅचचे माजी विद्यार्थी, मिञ तसेच सामाजिक कार्यकर्ते व पञकार फुलचंद भगत यांनी सदर टिमला भेट म्हणून दिले आहेत. सेवाभावी व सामाजिक संघटनांनीही अशाप्रकारे आपल्या यथाशक्ती मदत करुन सामाजिक कार्यात आपलाही सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांनी केले आहे.