Baramati : 28 / 05
१४७ कोटी ८१ लाख रुपयांच्या निधी ला मान्यता ( मनोहर तावरे )

संपूर्ण राज्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासासाठी शासनाच्या वतीने मोठा प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने याबाबत आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अष्टविनायक मंदिरांच्या संपूर्ण जीर्णोद्धार व विकास कामांसाठी आज सुधारित १४७ कोटी ८१ लाख रुपयांच्या निधी ला मान्यता मिळाली. अष्टविनायकातील पाच मंदिरे ही पुणे जिल्ह्यात तर एक अहिल्या नगर व दोन रायगड जिल्ह्यात आहेत. या नव्या आर्थिक तरतुदीनुसार प्रथम स्थान श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव ८ कोटी २१ लाख थेऊर चिंतामणी मंदिर ७ कोटी २१ लाख विघ्नहर ओझर ७ कोटी ८३ लाख तसेच महागणपती रांजणगाव साठी १२ कोटी १३ लाख रुपये खर्च मान्यता मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील वरद विनायक महड मंदिरासाठी २८ कोटी २४ लाख यानंतर बल्लाळेश्वर पाली मंदिरात २६ कोटी ९० लाख निधीची तरतूद आहे. अहिल्यानगर श्री सिद्धिविनायक सिद्धटेक येथे ९ कोटी ९७ लाख आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्याचा यामुळे विकासाला मोठी गती मिळणार आहे. येथील धार्मिक व पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल तसेच यातून स्थानिक रोजगार निर्माण होतील. येथील सर्वांगीण विकास होताना अनेक मोठे निर्णय राज्य पातळीवर घेतले जाणार आहेत. सर्व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे शासनाची धोरण आहे. या पर्यटन स्थळांचा विकास होताना. प्राचीन वास्तू जतन, संवर्धन, व्यवस्थापन करणे हा प्रमुख हेतू आहे. राज्य शासनाने याबाबत अधिकृत आदेश संकेतस्थळावर जाहीर केला. येणाऱ्या अल्पवधीतच या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या खर्चाला आज अंतिम मान्यता दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सह सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी विशेष परिश्रम घेतले.