शेख अरबाज आणि त्यांचे सहकारी शेख सलीम (नेखनूर) यांच्या वतीने ‘इन्फॅंट इंडिया’ येथील अनाथ आश्रमात स्नेहभोजन

BEED | पवित्र मोहरमच्या दहाव्या रोजा आणि एकादशी व्रतानिमित्त बीड जिल्ह्यात एक अत्यंत सुंदर आणि मानवतेचा संदेश देणारा उपक्रम पार पडला. शेख अरबाज आणि त्यांचे सहकारी शेख सलीम (नेखनूर) यांच्या वतीने ‘इन्फॅंट इंडिया’ येथील अनाथ आश्रमात राहणाऱ्या सुमारे ८० मुलांना स्नेहभोजन देण्यात आले.

या प्रसंगी साबुदाणा खिचडी, केळी आणि पोषणयुक्त अन्नाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शेख अरबाज आणि शेख सलीम यांनी स्वतः आपल्या हातांनी मुलांना अन्न वाटप करत प्रेम आणि आपुलकीचा आदर्श निर्माण केला.

हा उपक्रम केवळ धार्मिकता नव्हे तर धर्मनिरपेक्षता, मानवता आणि समाजातील एकोपा या मूल्यांचा जणू एक आदर्श नमुना ठरला. एकीकडे मोहरम म्हणजे बलिदान आणि संयमाचे प्रतीक, तर दुसरीकडे एकादशी ही आत्मशुद्धी आणि भक्तीचे प्रतीक. या दोन वेगवेगळ्या धार्मिक परंपरांमध्ये सामंजस्य साधत समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे, हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा होती.

स्थानिक नागरिकांनी आणि आश्रम प्रशासनाने या समाजोपयोगी कार्याबद्दल शेख अरबाज आणि शेख सलीम यांचे मनःपूर्वक आभार मानले.

“मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हेच आमचं खरे समाधान आहे,” असे नम्रपणे सांगून आयोजकांनी पुढील काळातही समाजकार्यात योगदान देण्याची तयारी दर्शवली.

बीड, 

NTV NEWS MARATHI