फुलचंद भगत
वाशिम:-तृतियपंथीयाच्या विविध समस्यांच्या निवारणार्थ आयोजीत,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दि. ०७ जुलै २०२५ रोजी, दुपारी १२:०० वाजता, जिल्हास्तरिय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीला सहाय्यक उपायुक्त पियुष चव्हाण यांचे सह, पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी तथा विशेष निमंत्रितामध्ये कारंजाच्या तृतियपंथी श्रावणी हिंगासपूरे यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्ह्यातील १८ तृतियपंथियानी नोंदणी केली असल्याचे व ६ तृतियपंथीयांची नविन नोंदणी झाल्याचे कळविण्यात आले. त्यापैकी सर्वांचे रेशनकार्ड झाली असून १८ व्यक्तींच्या व्यवसायाकरीता ९५००० प्रमाणे १७,१००००/- सतरालाख दहा हजार रु वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी कळवीले. यावेळी निमंत्रीत सदस्या श्रावणी हिंगासपूरे यांनी तृतियपंथीयाच्या घरकुलाच्या समस्येची मागणी लावून धरली असता,सर्वांना जागा असल्यास त्यांचे राहते जागेवर किंवा दिनदयाल योजनेअंतर्गत घरकूल मंजूरीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचेकडून मान्यता देण्यात आली. त्यानंतर आम्ही तृतियपंथी देखील समाजाचा घटक असल्यामुळे जिल्ह्याच्या शांतता समन्वय समितीमध्ये सहभागी करून घेण्याची आणि तृतियपंथी बहुउद्देशिय संस्थेच्या सदस्याला शासकिय निमशासकिय समितीमध्ये सहभागाची मागणी केली. त्यावर त्या मागणीलाही जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लगेच तत्वतः मान्यता दिली.असे वृत्त कळविण्यात आले आहे. एकंदरीत प्रथमदर्शनी या बैठकीत सामाजिक समस्यांबाबत आपण जागरूक असल्याचे श्रावणी हिंगासपूरे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले त्याबद्दल त्यांचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी कौतुक केले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206