एन टीव्ही न्यूज मराठी च्या माध्यमातून दरवर्षी शाही पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो यानिमित्ताने या वर्षालाही हा सोहळा अहिल्यानगर येथे मोठ्या थाटात संपन्न झाला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने या सोहळ्याचे प्रमुख होते. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार अहिल्या नगरचे आमदार संग्राम जगताप पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपजिल्हाधिकारी गणेश राठोड जेष्ठविधीतज्ञ एडवोकेट सुभाष काकडे व दूरदर्शनचे वार्ताहर विकास भोसले संपादक दैनिक मानदेश नगरी सोलापूर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला एन टीव्ही न्यूज मराठीचे मुख्य संपादक इकबाल शेख, अबरार शेख , रजत दायमा यांनी या सोहळ्याचे नियोजन केलेले होते या सोहळ्यामध्ये लासुर येथील पत्रकार रमेश नेटके यांना त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा महात्मा फुले समाज रत्नभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेले या पुरस्काराबद्दल त्यांना अनेक जणांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत