नागपूर
(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर)
कळमेश्वर तालुक्यातील तिडंगी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रकाश गुलाबराव घोटे यांना सन २०२२-२३ करिता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळं कळंमि ग्रामपंचायतीचे ओंकार ताग़ळे व खेरी लक्ष्मा अकड़ ग्रामपंचायतीचे विक्रांत आखाडे या ग्रामसेवकांचासुद्धा यावेळी गौरव करण्यात आला.
नागपूर येथे आयोजित सोहळ्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प.स.), जि. प. नागपूर कल्पना कनरे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद नागपूर यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. या सन्मानामुळे तिन्ही ग्रामपंचायती तसेच संपूर्ण कळमेश्वर तालुक्याचा मान उंचावला आहे. यावेळी जिल्हा परिषद नागपूरतर्फे एकूण ७८ आदर्श ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आ. आशिष देशमुख, माझा आमदार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पराग आनंद वर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी फुलचंद भगत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) कपिलनाथ कळमटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (वित्त) विजय इंगळे, यूनियन बँकेचे सुनील इंगळे (जिल्हा प्रमुख), उदय चव्हाण (सर्टिफिकेट्स), किशोर आलोटे (कार्याधिकारी), योगेश गजभिये (संपादक), सुनिता इंगळे (ग्रामविकास अधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी अधिकाऱ्यांना पुरस्कारासह प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.