वाशिम:-दिनांक 03/12/2021रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद तालुका मानोरा जि.वाशिम चे वतीने ग्रामीण रूग्णालय मानोरा येथे तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

यामध्ये तालुक्यातील एकोणविस पत्रकारांची मधुमेह ,रक्तदाब आदीसह विविध आजाराची आरोग्य तपासणी करण्यात आली.याप्रसंगी वै.अधिक्षक महेश राठोड, वै.अधिकारी वैभव खडसे,महीला आरोग्य अधिकारी सौ. दिपा चव्हाण , आरोग्य परिचारिका भारसाकळे ,नंदा राठोड,जिरे मॅडम,मराठी पत्रकार परिषद तालुका अध्यक्ष प्रविण ठाकरे,ता.सचिव वसंता राठोड, विभागीय सचिव जगदीश राठोड ,आदीची उपस्थिती होती.