
सिरोंचा (गडचिरोली): मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सिरोंचा तालुक्यातील असरअली ग्रामपंचायत येथे नुकतेच तीन दिवसीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य सेवांचा लाभ घेतला, तसेच शिबिरात तब्बल २०० आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली आणि त्यांना मोफत उपचार पुरवण्यात आले. या उपक्रमाने ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या घराच्या जवळच आवश्यक आरोग्य सुविधा मिळण्यास मदत झाली.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी विलास चोप्पावार यांनी आयोजन केले, तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

या आरोग्य शिबिरासाठी डॉ. प्रतिक्षा देवतळे, डॉ. चव्हाण, टेक्निशियन मनोज माचा, बंदेला नर्स, दुर्गा मेडिझर्ला, पोसक्का तुमनूरी यांनी रुग्णांची तपासणी आणि उपचारासाठी विशेष परिश्रम घेतले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सिरोंचाचे BDO मा. S.N. कस्तुरे, अशोक बंडावार, सरपंच रमेश तैनेनी, गजाननजी कलाक्षपवार, आणि सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत सुगरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात शेकडो रुग्णांनी उपस्थिती दर्शवून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी आणि आयुष्मान कार्डाच्या वितरणाने ग्रामस्थांना आरोग्य सुरक्षिततेची हमी मिळाली आहे.
