गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे

राज्यातील “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पेमेंट पूर्ण केले असतानाही संबंधित संकेतस्थळ गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प असल्याची तक्रार पुढे येत आहे. यामुळे अर्जाच्या पुढील प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडले आहेत.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार,

पेमेंट यशस्वी झाल्याचा मेसेज व पावती मिळूनही

पोर्टलवर लॉगिन होत नाही,

स्टेटस अपडेट दिसत नाही,

तर काहींच्या अर्जांची नोंदही ‘एरर’ दाखवत आहे.

यामुळे अनेकांना “आपले पैसे वाया तर गेले नाहीत ना?” अशी भीती वाटू लागली आहे.

वाहेगाव येथिल काही शेतकऱ्यांनी सांगितले की,

“आम्ही विश्वास ठेवून पेमेंट भरले, पण साइट चालतच नाही. अर्ज पुढे जात नाही. कोणाकडे तक्रार द्यायचीही माहिती नाही.”

दरम्यान, योजनेअंतर्गत राज्यभरात मोठ्या प्रमाणावर अर्ज झाले असून तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद पडल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र अधिकृतरित्या महावितरण किंवा ऊर्जाविभागाकडून कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.

शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की —

साइट त्वरित सुरू करण्यात यावी,

पेमेंट भरलेल्या अर्जदारांना प्राधान्याने स्थिती अपडेट मिळावी,

आणि जर तांत्रिक बिघाड असेल तर त्याबाबत अधिकृत सूचना जारी करावी.

योजनेबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या असताना, अचानक पोर्टल ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *