AKOLA | बाळापूरः आज दि ५ जानेवारी २०२६ श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव यांचे वतीने कै. गोविंदराव उपाख्य बापूसाहेब मानकर यांचा ५६ वा स्मृतिदिन तसेच वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री.अनिलजी कोल्हे अधीक्षक वेतन व भनीनी पथक जि. प. अकोला तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.डॉ.अरविंदजी मोहरे शिक्षणाधिकारी (माध्य) जी.प.अकोला , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.सौ.पूजा निलेश खडसने स्वीय सहाय्यक सहसंचालक उच्च शिक्षण, अमरावती यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष संतोषदादा मानकर यांनी प्रथमच शाळेत आलेले शिक्षणाधिकारी अरविंदजी मोहरे यांचे स्वागत केले. मा.अनिलजी कोल्हे यांचे स्वागत संस्थेचे सदस्य विश्वनाथ मानकर तसेच उपाध्यक्ष डॉ. वासुदेवराव फाळके यांनी केले तर सौ. पूजा खडसने मॅडम यांचे स्वागत संस्थेचे सचिव डॉ. हिम्मतराव घाटोळ यांनी केले.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती डॉ. श्री. अविनाश इंगळे (माजी विद्यार्थी) प्रोफेसर व अधिष्ठाता एम्स ,रायपुर यांचा सत्कार शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांनी तर मा. श्री. निलेश खडसने (माजी विद्यार्थी) शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती यांचं सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल कोल्हे यांनी केला. सतत चार दिवस चालणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये दी.६ जानेवारी ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री.जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय करणार आहेत. दि ७ जानेवारी ला आंतरशालेय गोविंद वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच दि. ८ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री.जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगाव यांनी केले आहे.
कार्यक्रमाला स्व.भाऊसाहेब तिरुख विद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र तिरुख , स.ल. शिंदे विद्यालयाचे अध्यक्ष गिरीशजी शिंदे ,संचालक अनिल निखाडे, सनराइज ज्ञानपीठचे अध्यक्ष श्रीकांत ताले, बहिणाबाई खोटरे विद्यालयाचे अध्यक्ष रमेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते मनोरराव राहणे तसेच अरुण काकड मंचावर उपस्थित होते. विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ.हिम्मतराव घाटोळ यांनी तर पाहुण्यांचा परिचय वसंत वक्टे यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उर्मिला मानकर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री.गोपाल मानकर यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे उपमुख्याध्यापक अविनाश शिंदे, पर्यवेक्षक गोपाल घनमोडे ,गावातील प्रतिष्ठित नागरिक,पालकवर्ग ,शाळेचे सेवानिवृत्त कर्मचारी,शाळेतील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप शेवटी राष्ट्रगीताने करण्यात आला.
अमोल जामोदे
