गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे
न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल, वाहेगाव येथे दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व संस्कारांचे बीज रोवले गेले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शाळेचे संचालक श्री. बाबासाहेब हिवाळे सर व मुख्याध्यापिका श्रीमती ख्रिस्तीना गणराज यांच्या हस्ते पूजन विधी पार पडला.
यावेळी कु. कार्तिकी जाधव, श्रुष्टी मनाळ, तनुज्या मनाळ या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार व जिजाऊ मातेच्या त्यागमय जीवनकार्यावर प्रभावी भाषणे केली. शिक्षक श्री. महेश सोनवणे सर, श्रीमती पुनम अंदुरे व श्रीमती ख्रिस्तीना गणराज यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन दारुटे सर यांनी नेटकेपणाने केले, तर आभार प्रदर्शन श्री. रमेश उबाळे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
