• चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त उपक्रम; अनुयायांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

महाड प्रतिनिधी | दि: २२ मार्च २०२६

रायगड: क्रांतिभूमी महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त ‘भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन, नागपूर’ तर्फे भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण करण्यात आले. २० मार्च २०२६ रोजी आयोजित या उपक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या अनुयायांनी मोठा प्रतिसाद दिला.

अभिवादन आणि संविधान वाचन

कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. महाड येथे आलेल्या अनुयायांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करून या पवित्र ग्रंथाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न संघटनेने केला.

मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन

सदर कार्यक्रम डॉ. दिलीप पाटील (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आप्पासाहेब समिंदर (उपजिल्हाधिकारी) यांच्या हस्ते झाले.

प्रमुख वक्ते:

  • मा. सिद्धेश्वर कांबळे (मुख्य कार्यकारी अधिकारी, बीदर – कर्नाटक)
  • मा. येतीश हाडके (उपसंचालक, दूरदर्शन विभाग, मुंबई)
  • मा. एस. पी. दीक्षित (माजी जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, कोल्हापूर)
  • मा. अरविंद कांबळे (सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा, कोल्हापूर)
  • डॉ. संतोष पाटील (मुंबई)
  • प्रा. सुधाकर कांबळे (पोलादपूर – रायगड)

या सर्व वक्त्यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि ‘भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन’च्या कार्याचे कौतुक केले.

विशेष उपस्थिती आणि सत्कार

कार्यक्रमाला मा. तारा मेश्राम (वार्ताहर, दलित उद्धार टीव्ही चॅनेल, नागपूर) आणि मा. मंगला यूईके (अध्यक्ष, आदिवासी मंडळ, नागपूर) यांची विशेष उपस्थिती होती. मंगला यूईके यांनी आपल्या पारंपारिक आदिवासी वेशभूषेत उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव डॉ. संजय रायबोले यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. नितीन चवरे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. बालाजी लातुरे (कोल्हापूर) यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे प्रा. सुधाकर कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. बालाजी लातुरे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून चोख जबाबदारी पार पाडली.

उपस्थित मान्यवर

कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध विभागांतून मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने: डॉ. चंद्रमणी गजभिये, डॉ. सद्गुरुनाथ गायकवाड, प्रा. मंगेश वागदे, डॉ. उमेश कुऱ्हाडे, डॉ. सिद्धार्थ वाकूडे, डॉ. मनोहर बांदरे, प्रा. लितांज उके, प्रा. अरविंद पाझारे, आयु. सुरेश गजभिये, आयु. दिनेश बोधनकर, सुहास आढाव यांचा समावेश होता.


वृत्त संकलन: विशेष प्रतिनिधी, महाड, रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *