आशाताईंचे संगीत क्षेत्रातील योगदान तरुण पिढीसाठी प्रेरणादायी..!
— आमदार डॉ आशिषराव देशमुख

पद्मविभूषण, गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आणि भारतीय संगीतविश्वाला अमूल्य ठेवा दिला.
त्यांच्या आवाजातील माधुर्य, विविधता आणि भावपूर्णता यामुळे त्यांनी प्रत्येक गीत अजरामर केले. कुठल्याही प्रकारचे गायन असो, त्यांनी त्या गायनाला पूर्ण न्याय दिला, श्रोत्यांची मने जिंकली. त्यांचे योगदान केवळ संगीतापुरते मर्यादित नसून, ते भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनले आहे. तरुण पिढीसाठी आशाताईंचे संगीत क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारियांस या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी भावपूर्ण शोक संवेदना सावनेरचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
