जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील शकील (कालू) शिराज पिंजारी यांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. सुरत येथे कामावर जात असताना त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शकील (कालू) शिराज पिंजारी यांचे दिनांक १० रोजी दुपारी सुरत येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुरत येथे कामावर जात असताना त्यांना अचानक छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शकील पिंजारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *