तालुक्यातील देसवंडी येथील घटना : पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर : राहुरी तहसीलदारांना वाळू उपशाची माहिती दिल्याने राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील एका कुटुंबीयांना पन्नास जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नंदकुमार कचरू गागरे यांनी राहुरी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सुमारे पन्नास – जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी नंदकुमार गांगरे, त्यांचे वडील, आई व पत्नी हे सर्वजण घरात होते. त्यावेळी सुमारे पन्नास आरोपी काठ्या, कुऱ्हाडी, कोयते व चैन घेऊन आले. तू आमच्या विरोधात तहसीलदार यांना फोन केल्याने आमचा वाळूचा धंदा बंद झाला. तू आमचे नादी लागू नको. तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकतो. आज आम्ही पन्नास जण आलो. उद्या पाचशे जण येऊ. तुझा व घरच्यांचा काटा काढू. अशी धमकी दिली. फिर्यादीवरून सुनील म्हस्के, पप्पू. शिंदे, संदीप गायकवाड, रावसाहेब लोखंडे, लखन बापू शिंदे, संतोष जाधव, भाऊसाहेब रमेश म्हस्के, अविनाश न भांबळ, सागर भांबळ, भावा मनोहर न म्हस्के, सागर गुंबरे, लखन जाधव, रामा न जाधव, अजय चितळकर, बंटी ने गायकवाड (सर्व रा. तांदुळवाडी, रेल्वे नू स्टेशन, ता. राहुरी) यांच्यासह इतर ३९ ते ३५ अनोळखी व्यक्ती अशा सुमारे . पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात ा आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हनुमंत नू आव्हाड हे करीत आहेत.