वाशिम:मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यानी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याकरीता वेळोवेळी महाराष्ट संघटीत गुन्हेगारी कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम,शस्त्र अधिनीयम,दारबंदी अधिनीयम.जुगार, अवैध गुटखा प्रकरणी कार्यवाही करुन गुन्हेगाराना कायदयाचा बडगा दाखविला आहे. वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर विशेष मोहीम राबविण्याचे रात्र सुरु असताना पो.स्टे.रिसोड येथे
यापुर्वी 11.5 क्विंटल गांजा जप्त करुन विदर्भातील सर्वात मोठी रेड करुन आतापर्यंत 13 आरोपी अटक
करण्यात आले आहे.

मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम याचे माहितीवरुन एस एम.जाधव, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथक सपोनि मोहनकर व पथक यानी आज दि. 23/01/2022 रोजी पोलीस स्टेशन रिसोड शहरातील धोबी गल्ली रिसोड येथील जुण्या इमारतील वेगवेगळया कंपनीचा गुटखा इसम नामे सुनिल रामसुख तापडीया व इतर 01 हे त्यांचेकडे शासनाने बंदी घातलेला गुटखा साठा नमुद अवैध गुटखा विक्रेत्यावर कार्यवाही करुन अंदाजे बाजार किमत 1,50,000.00 (दिड कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त केला असुन पंचनामा व कायदेशीर कार्यवाही सुरु आहे जप्तीची करुन 02 इसमांना ताब्यात घेवुन तबाखुजन्य प्रतिबंधक कायदयान्वये कार्यवाही करण्यात येणार आहे.तसेच मागील दोन ते तिन दिवसात दि.20/01/2022 रोजी मा.पोलीस अधिक्षक, श्री बच्चन सिंह वअपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा वाशिम येथील 03 पथक तयार करुन पो.स्टे.मानोरा हददीतील ग्राम कुपटा येथील अवैधरित्या वरली मटका साहित्यावर जुगारखेळणा-या लोकांवर रेड करुन 240350/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला. तसेच पो.स्टे.मालेगाव हददीतील ग्राम पागराबंदी येथे वरली मटका धंदयावर रेड करन 4810/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला तसेच मालेगाव हददीतील ग्राम पिंगळवाडी येथे वरली मटका धंदयावर रेड करुन 2,66,510/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला.

तसेच पो.स्टे.मंगरुळपीर हददीतील ग्राम मानोली येथे अवैधरित्या वरली मटका खेळणा-यालोकाविरुध्द कारवाई करुन 16,750 रुपयाचा मुददेमाल व दि.21/01/2022 रोजी पोहरादेवी येथे अवैधरित्या जुगार खेळणा-या लोकांविरुध्द 32,250 रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. उपरोक्त कारवाई मा.श्री बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री एस.एम. जाधव यांचे पथकातील सपोनि अतुल मोहनकर, पोउपनि शब्बीर पठाण, पोहेकॉ किशोर चिंचोळकर,सुनिल पवार, गजानन अवगळे, दिपक सोनवने, पोना मुकेश भगत, राजेश राठोड, अमोल इंगोले, अश्विन जाधव, राजेश गिरी, प्रशांत राजगुरु पोशि संतोष शेनकुटे,डिगांवर मोरे यानी केली आहे.वाशिम जिल्हयातील पोलीस दलातर्फे जनतेला आवाहन करण्यात येते की, कोणालाही अवैध धंदयाबाबतची माहिती असल्यास त्यानी पोलीस स्टेशन किंवा स्थानीक गुन्हे शाखेतील अधिकारी याना प्रत्यक्ष भेटुन अथवा फोनव्दारे दयावी. माहिती देणा-याबाबत पुर्णपणे गोपनीयता ठेवण्यात येईल.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम