सोनखास शहापूर वासियांची तहान बहु प्रतीक्षेनंतर भागणार

16 कोटी 87 लाख 44 हजार 325 रु.ची पाणीपुरवठा योजना मंजूर

वाशिम : गेल्या अनेक वर्षापासून मंगरूळपीर शहरालगतच्या सोनखास, शहापूर ग्रामवासीयांचा जिव्हाळ्याचा नव्हे तर जीवन मरणाचा प्रश्न ठरलेली पाणीपुरवठा योजना अखेर शासन स्तरावरून मंजूर करण्यात जि.प.सदस्या सौ. सुनिता पांडुरंग कोठाळे यांना यश आले .25 जानेवारी 2020 रोजी शासनाच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने शासन निर्णय करून जल जिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 16 कोटी 87 लाख 44 हजार 325 रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरात दिली .

सोनखास,शहापूर ग्रामपंचायत ही मंगरूळपीर शहराला लागून असलेली ग्रामपंचायत आहे. ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.मंगरुळपीर शहर वाढीनंतर शहरातील बहुतांश लोकांनी या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत निर्माण झालेल्या नवीन अकृषक जमिनीवर आपली घरे बांधली व पाहता पाहता ग्रामपंचायत वस्ती अवाढव्य वाढली. परंतु ज्या वेगाने वस्ती वाढली त्या वेगाने सोयी-सुविधा वाढल्या नाही.अत्यावश्यक असलेल्या पाण्यासाठी लोकांना उन्हाळ्यात भटकावे लागते किंवा बेभावाने टॕकर घ्यावे लागतात. एक तर ह्या गावाच्या जमिनीत पाण्याची पातळी अत्यल्प आहे म्हणून या भागातील विहिरी व बोअरचे पाणी फेब्रुवारीपर्यंत टिकतात आणि मार्चपासून पाण्याची समस्या निर्माण होते. मग हजार लिटर साठी 200 ते 400 रुपये मोजावे लागतात.श्रीमंत व कर्मचारी हे सहन करतात पण गरिबांना ह्या पाणी टंचाईला तोंड देताना जीव मेटाकुटीस येतो .हिच बाब हेरून जि.प.सदस्या सौ. सुनिता पांडुरंग कोठाळे यांनी सतत पाठपुरावा करून आज ही योजना शासनामार्फत मंजूर करून घेऊन या गावातील लोकांचा महत्त्वाचा पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नांना यश प्राप्ती केले.

यासाठी त्यांना माजी राज्यमंत्री श्री सुभाषरावजी ठाकरे, जि.प.अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पाणीपुरवठामंत्री संजय बनसोडे , वाशिम जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री राऊत व उपकार्यकारी अभियंता राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सोनखास ,शहापूर येथील प्रत्येक घरातील तोटीतून पाणी वाहणार नाही तोपर्यंत माझी लढाई थांबणार नाही अशी प्रतिक्रिया सौ. सुनिता पांडुरंग कोठाळे यांनी दिली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *