वाशिम : ‘रोड आमच्या बापाचाच’या गुर्मीत काही नागरीक सध्या वागत असुन भररस्त्यात आणी रहदारीच्या ठिकाणी वाहने ऊभी करुन विनाकारण वाहतुकीस अडथळा आणल्या जात आहे.ये जा करणारे नागरीक,वृध्द,महिला यांना ञास होत असुन इतर वाहनकारकांनाही वाहणे चालवतांना मोठी अडचण होत आहे.काही रोडरोमियोही भरधाव वाहणे चालवून तसेच कर्णकर्कश हाॅर्न वाजवुन शहराची शांतता भंग करण्याचे चिञ सध्या पाहावयास मिळत आहे.

मुख्य चौकात,जिथे भेलगाड्या आहेत अशा महात्मा फुले चौक,डाॅ.आंबेडकर चौक,अकोला चौक आदी ठिकाणी महिला मुली संध्याकाळच्या वेळी येतात त्यामुळे इथे चिडिमारीचे प्रकारही अधुनमधुन घडतात परंतु महिला पुढाकार घेत नाहीत आणी मुकाट ञास सहन करतात असेही दिसते.अशा ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरु करावी आणी निर्भया पथक कार्यान्वित करावे जेणेकरुन या चिडिमाराचा बंदोबस्त करता येइल.शहरात ट्रिपलसिटचेही प्रमाण वाढलेले दिसते आणी लहान बालकेही विनालायसन्स वाहने चालवतांना दिसत आहेत यामुळे अपघात होण्याची दाट संभावना दिसते. अशी मागणी महिलांकडुन होत आहे. नुकतेच रुजु झालेले मंगरुळपीरचे ठाणेदार श्री.सुनिल हुड हे कर्तव्यदक्ष आणी आपल्या कार्यशैलीने कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी नावलौकिक आहेत.मंगरुळपीर शहरातील सध्या बेताल झालेली वाहतुक व्यवस्था सुरळित करण्यावर भर देवून रोडवर वाहणे ऊभी करणारांवर कायदेशिर कारवाई करावी आणी मूख्य चौकात वाहतुक पोलीस तैनात करुन रहदारीमधील अडथळे दुर करावे आणी होनारे संभाव्य अपघात टाळावेत अशी मागणी शहरवासियांमधुन होत आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *