वाशिम : ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या हेतुने स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे आदी समस्या व ग्रामीण क्षेत्रातील रस्ते,नाली व सर्वंकष कामे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी, कारंजा नप माजी नगराध्यक्ष श्री दत्तराज डहाके,रांका प्रदेश सचिव बाबारावजी खडसे,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक श्री अशोक भाऊ परळीकर, अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक श्रीमती सोनालिताई ठाकूर व मंगरूळपीर नप नगरसेवक श्री विनोद पाटील यांनी ९ फेब्रुवारी रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.श्री हसन मुश्रीफ साहेब यांचे दालनात भेऊ घेऊन उपरोक्त विषयावर विस्तृत चर्चा व समीक्षा केली.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206