अमरावती : दर्यापूर येथील शिखर करियर ॲकडमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक रामूसेठ मालपाणी, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संदीप पांडेकर, प्रा. रविंद सरकार, प्रमुख उपस्थिती डॉ. भूषण कट्टा, कल्पेश भैया, महेश बुंदे, दिनेश झंवर, विजय चौरपगार, रामेश्वर वाकपांजर, गणेश विल्हेकर, व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या एका जातीपुरते मर्यादित नसून त्यांनी अठरापगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केले असल्याचे प्रतिपादन प्रा. संदीप पांडेकर, प्रा. रवींद्र सरकार यांनी केले तर महेश बुंदे यांनी मनोगत व्यक्त करून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिखर करियर ॲकडमी मध्ये सैन्य भरतीची तयारी करणारे विद्यार्थ्यांत नितीन खोबरे, सतीश मस्के, आकाश अवचार, सागर कळसकार, प्रवीण गंजेवार, अनिल नागफासे, विशाल चक्रे, सुरेंद्र जमरे, विजय नागफासे, महेश सुंडे, चेतन सोनटक्के, समीर बुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिखर करिअर ॲकडमीचे संचालक पंकज दुदंडे यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज दुदंडे, बहारदार सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन मंगेश वाघमारे यांनी केले. सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *