चंद्रपूर : 19-20 डिसेंबरला वर्धा येथील सत्तेश्वर हॉल येथे महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पिवशीप 2022 पार पडली या स्पर्धेत कराटे & फिटनेस क्लब मूलचे 12 खेळाडू सहभागी झाले होते स्पर्धेचा आकर्षण असणाऱ्या पैकी एक ब्लॅक बेल्ट काता इव्हेंटमध्ये क्लब चे सहप्रशिक्षक अमन पठाण यांनी दमदार प्रदर्शन करत प्रथम स्थान मिळविला

तर अन्य वजन-वयोगटात श्रीजा सहारे एक सुवर्ण एक रजत पदक, दिव्या नरड दोन सुवर्ण पदक, नैतिक ढोबे दोन सुवर्ण पदक, स्वरा वाकडे रजत पदक, तमन्ना बोरकुटे एक सुवर्ण एक कांस्य पदक, यश गावंडे एक सुवर्ण एक कांस्य पदक , आहाना सहारे रजत पदक, श्रावणी मेश्राम एक सुवर्ण एक कांस्य पदक , धरती भोयर एक सुवर्ण एक कांस्य पदक , श्रीनिधी येनुगवार एक सुवर्ण एक कांस्य पदक, वैष्णवी मानकर कांस्य पदक अशे 10 सुवर्ण,3 रजत आणि 5 कांस्य मिळून एकूण 18 पदक मिळविली.
वरील सर्व विजेते कराटे अँड फिटनेस क्लब मूल मध्ये संचालक प्रशिक्षक इम्रान खान व निलेश गेडाम तसेच सहप्रशिक्षक सुमेध पेंदोर, हर्ष रोहनकर,साक्षी गुरनुले आणि हर्षल याल्लेवार यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतात,विजेत्यांना मुख्य मार्गदर्शक सेंसाई विनय बोढे व सेंसाई कपिल मसराम यांचा मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
मूल (सतीश आकुलवार)